| अनुक्रमांक | पेपर क्रमांक | विषय | गुण | दर्जा | माध्यम | कालावधी | पात्रता / अनिवार्यता | प्रशापत्रिकेचे स्वरूप |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | पेपर १ | मराठी | ३०० | माध्यमिक | मराठी | ३ तास | अनिवार्य (२५ टक्के गुणांसह पास होणे आवश्यक ) | वर्णनात्मक/ पारंपारिक |
| २ | पेपर २ | इंग्रजी | ३०० | मध्य मिक | इंग्रजी | ३ तास | अनिवार्य (२५ टक्के गुणांसह पास होणे आवश्यक ) | वर्णनात्मक/ पारंपारिक |
| ३ | पेपर ३ | निबंध | २५० | पदवी | इंग्रजी / मराठी | ३ तास | अनिवार्य | वर्णनात्मक/ पारंपारिक |
| ४ | पेपर ४ | सामान्य अध्ययन १ | २५० | पदवी | इंग्रजी / मराठी | ३ तास | अनिवार्य | वर्णनात्मक/ पारंपारिक |
| ५ | पेपर ५ | सामान्य अध्ययन २ | २५० | पदवी | इंग्रजी / मराठी | ३ तास | अनिवार्य | वर्णनात्मक/ पारंपारिक |
| ६ | पेपर ६ | सामान्य अध्ययन ३ | २५० | पदवी | इंग्रजी / मराठी | ३ तास | अनिवार्य | वर्णनात्मक/ पारंपारिक |
| ७ | पेपर ७ | सामान्य अध्ययन ४ | २५० | पदवी | इंग्रजी / मराठी | ३ तास | अनिवार्य | वर्णनात्मक/ पारंपारिक |
| ८ | पपेर ८ | वैकल्पिक विषय पेपर १ | २५० | पदवी | इंग्रजी / मराठी | ३ तास | अनिवार्य | वर्णनात्मक/ पारंपारिक |
| ९ | पेपर ९ | वैकल्पिक विषय पेपर | २५० | पदवी | इंग्रजी / मराठी | ३ तास | अनिवार्य | वर्णनात्मक / पारंपारिक |
या पेपरचा उद्देश उमेदवाराची गंभीर गद्य वाचण्याची आणि समजून घेण्याची क्षमता आणि मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकपणे विचार व्यक्त करण्याची क्षमता तपासणे हा आहे.
प्रश्नांचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे असेलः
हा पेपर केवळ पात्रता स्वरूकाचा असेल. या पेपरमध्ये मिळालेले गुण रैंकिंगसाठी मोजले जाणार नाहीत.
या पेपरचा उद्देश उमेदवाराची गंभीर गद्य वाचण्याची आणि समजून घेण्याची क्षमता आणि इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकपणे विचार व्यक्त करण्याची क्षमता तपासणे हा आहे.
प्रश्नांचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे असेलः
हा पेपर केवळ पात्रता स्वरूपाचा असेल. या पेपरमध्ये मिळालेले गुण रँकिंगसाठी मोजले जाणार नाहीत.
निबंधाच्या पेपरमध्ये, उमेदवारांना अनेक विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असू शकते.
त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली जाईल की त्यांनी निबंधाच्या विषयाशी निगडित राहावे, त्यांचे विचार सुव्यवस्थितपणे मांडवे आणि संक्षिप्तपणे लिहावे.
यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, जगाचा इतिहास आणि भूगोल आणि समाज (महाराष्ट्र राज्यासाठी विशेष भारांशासह) यांचा समावेश
| अनुक्रमांक | विषय | विषयामध्ये समाविष्ट घटक |
|---|---|---|
| १ | भारतीय संस्कृती | प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या कला प्रकार, साहित्य आणि वास्तुकलेच्या ठळक पैलू |
| २ | भक्ती चळवळ | भक्ती चळवळ आणि त्याचे तत्वज्ञान, महाराष्ट्रातील संतांच्या चळवळीच्या विशेष संदर्भासह |
| ३ | आधुनिक भारतीय इतिहास | अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते वर्तमानापर्यंतचा आधुनिक भारतीय इतिहास- महत्त्वपूर्ण घटना, व्यक्तिमत्व आणि मुद्दे. |
| ४ | स्वातंत्र्य लढा | स्वातंत्र्य लढ्याचे विविध टप्पे आणि देशाच्या विविध भागांतील महत्त्वाचे योगदानकर्ते/त्यांचे योगदान. |
| ५ | स्वातंत्र्यानंतरचा काल | स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. |
| ६ | जगाज इतिहास | जगाच्या इतिहासामध्ये १८ व्या शतकापासूनच्या घटनांचा समावेश असेल जसे की औद्योगिक क्रांती, महायुद्धे, राष्ट्रीय सीमांचे पुनर्रचना, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, राजकीय तत्त्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इ. त्यांची रूपे आणि समाजावर होणारा परिणाम. |
| ७ | भारतीय समाज | भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये; भारताची विविधता |
| ८ | भारतातील समस्या | महिलांची आणि महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि संबंधित मुद्दे, गरिबी आणि विकासात्मक मुद्दे, शहरीकरण, त्यांच्या समस्या आणि उपाय. |
| ९. | जागतिकीकरण | भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम. |
| १० | भारतील समाज | सामाजिक सक्षमीकरण, जातीयवाद, प्रादेशिकतावाद, धर्मनिरपेक्षता |
| ११ | भूगोल | जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्ये. |
| १२ | औद्योगीकरण | संपूर्ण जगातील महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनांचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंडासह); जगाच्या (भारतासह) विविध भागांमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक क्षेत्रातील उद्योगांच्या स्थापनेसाठी जबाबदार असलेले घटक. |
| १३ | भू-भौतिक घटना | महत्त्वाच्या भू-भौतिक घटना जसे की भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी क्रिया, चक्रीवादळ इ., भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान - महत्त्वपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्यांमधील बदल (पाणीसाठा आणि बर्फाच्छादित प्रदेशांसह) आणि वनस्पती व प्राणी यांच्यामधील बदल आणि अशा बदलांचे परिणाम. |
यामध्ये शासन, संविधान, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध (महाराष्ट्र राज्यासाठी विशेष भारांशासह) या घटकांचा समावेश आहे
| अनुक्रमांक | विषय | विषया अंतर्गत घटक |
|---|---|---|
| १ | भारतीय संविधान | ऐतिहासिक आधार, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्त्या, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना |
| २ | संघराज्य आणि राज्य | संघराज्य आणि राज्यांची कार्ये आणि जबाबदाऱ्याः संघराज्य संरचनेशी संबंधित समस्या आणि आव्हाने, स्थानिक स्तरापर्यंत अधिकारांचे आणि वित्ताचे हस्तांतरण आणि त्यातील आव्हाने. |
| ३ | यंत्रणा आणि संस्था | विविध अंगामधील अधिकारांचे पृथक्करणः विवाद निवारण यंत्रणा आणि संस्था |
| ४ | भारतीय संविधानाची तुलना | भारतीय घटनात्मक योजनेची इतर देशांशी तुलना |
| ५ | भारताची संसद आणि विधिमंडले | संसद आणि राज्य विधीमंडळः संरचना, कामकाज, कार्यपद्धती, अधिकार व विशेषाधिकार आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे |
| ६ | कार्यकारी मंडळ आणि न्यायसंस्था | कार्यकारी मंडळ आणि न्यायसंस्थेची संरचना, संघटन आणि कामकाजः सरकारची मंत्रालये आणि विभाग; दबाव गट आणि औपचारिक/अनौपचारिक संघटना आणि राज्यव्यवस्थेतील त्यांची भूमिका |
| ७ | स्थानिक स्वराज्य संस्था | |
| ८ | लोकप्रतिनिधी कायदा | लोकप्रतिनिधी कायद्याची ठळक वैशिष्ट्ये. |
| ९ | घटनात्मक पद | विविध घटनात्मक पदांवर नियुक्तीः विविध घटनात्मक संस्थांचे अधिकार, कार्ये आणि जबाबदाऱ्या |
| १० | वैधानिक, नियामक आणि विविध अर्ध-न्यायालयीन संस्था. | |
| ११ | सरकारी धोरणे | विविध क्षेत्रांतील विकासासाठी सरकारी धोरणे आणि हस्तक्षेपः त्यांच्या आराखड्यामुळे design() आणि अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे |
| १२ | विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग | स्वयंसेवी संस्था (NGOs), बचत गट (SHGs), विविध गट आणि संघटना, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक आणि इतर भागधारकांची भूमिका. |
| १३ | लोककल्याण योजना | लोकसंख्येच्या असुरक्षित घटकांसाठी केंद्र आणि राज्यांच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरीः या असुरक्षित घटकांच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी स्थापन केलेली यंत्रणा, कायदे, संस्था आणि संस्थात्मक संरचना. |
| १४. | आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधन | आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधने यांशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे |
| १५. | गरीबी आणि भूकेशी संबंधित मुद्दे | |
| १६. | शासनानेसंबंधी | शासनाच्या महत्त्वाचे पैलूः पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, ई-गव्हर्नन्स- उपयोजन (applications), मॉडेल्स, यश, मर्यादा आणि क्षमता; नागरिक सनद (citizens charters), पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाय |
| १७. | लोकशाहीमध्ये नागरी सेवांची (Civil Services) भूमिका. | |
| १८. | भारत आणि इतर देश | भारत आणि त्याचे शेजारील देशांशी संबंध. |
| १९. | भारत आणि इतर देश या मधील करार | द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट आणि भारताचा समावेश असलेले आणि/किंवा भारताच्या हितावर परिणाम करणारे करार |
| २० | विकसित आणि विकसनशील देशामधील धोरणे | विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा आणि राजकारणाचा भारताच्या हितावर आणि भारतीय डायस्पोरा (परदेशातील भारतीय) वर होणारा परिणाम |
| २१. | आन्तर राष्ट्रीय संस्थ | महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी आणि मंचः त्यांची संरचना आणि कार्यकक्षा (mandate) |
यामध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन (महाराष्ट्र राज्यासाठी विशेष भारांशासह) या विषयाच्या घटकांचा समावेश आहे
| अनुक्रमांक | विषय | विषयांअंतर्गत घटक |
|---|---|---|
| १ | भारतीय अर्थव्यवस्था | नियोजन, संसाधनांचे संकलन, वाढ, विकास आणि रोजगाराशी संबंधित मुद्दे. |
| २ | समावेशक वाढ (Inclusive growth) आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे | |
| ३ | सरकारी अर्थसंकल्प (Government Budgeting) | |
| ४ | प्रमुख पिके | देशाच्या विविध भागांतील पीक पद्धती, सिंचनाचे विविध प्रकार आणि सिंचन व्यवस्था; कृषी उत्पादनांची साठवणूक, वाहतूक आणि विपणन (marketing) आणि संबंधित मुद्दे व मर्यादा; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ई-तंत्रज्ञान. |
| ५ | अन्नधान्य आणि शेती विषयक घटक | थेट आणि अप्रत्यक्ष शेती अनुदाने (subsidies) आणि किमान आधारभूत किमतीशी (MSP) संबंधित मुद्दे; सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS)- उद्दिष्टे, कामकाज, मर्यादा, सुधारणा; बफर स्टॉक आणि अन्न सुरक्षेचे मुद्दे; तंत्रज्ञान मोहिमा; पशुपालन अर्थशास्त्र |
| ६ | आंनप्रक्रिया आणि संबंधीत उद्योग | भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योगः व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, ऊर्ध्वगामी (upstream) आणि अधोगामी (downstream) गरजा, पुरवठा साखळी व्यवस्थापन |
| 7. | जमीन विषयक घटक | भारतातील जमीन सुधारणा |
| ८. | उदारीकरण | अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे (liberalization) परिणामः औद्योगिक धोरणातील बदल आणि त्यांचा औद्योगिक वाढीवर होणारा परिणाम |
| ९. | पायाभूत सुविधा | ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इ. |
| १०. | गुंतवणूक मॉडेल्स. | |
| ११. | विज्ञान आणि तंत्रज्ञान | दैनंदिन जीवनातील घडामोडी, त्यांचे उपयोजन आणि परिणाम. |
| १२ | विज्ञान आणि तंत्रज्ञान | विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारतीयांचे यशः तंत्रज्ञानेचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे |
| १३. | तंत्रज्ञान | माहिती तंत्रज्ञान (IT), अवकाश (Space), संगणक, रोबोटिक्स, नॅनो-तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान या क्षेत्रातील जागरूकता आणि बौद्धिक संपदा अधिकारांशी (IPR) संबंधित मुद्दे. |
| १४. | पर्यावरण आणि संरक्षण | संरक्षण, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA) |
| १५. | आपत्ती | आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापनः आपत्ती जोखीम लवचिकता, लवचिक समाज. |
| १६. | विकास आणि अतिरेकी विचारांचा (extremism) प्रसार यांच्यातील संबंध | |
| १७. | अंतर्गत सुरक्षा | अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि गैर-राज्य घटकांची (non-state actors) भूमिका. |
| १८. | अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने | दळणवळण जाळ्याद्वारे अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हानेः अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सची भूमिका, सायबर सुरक्षेची मूलभूत तत्त्वे; मनी लाँड्रिंग आणि त्यास प्रतिबंध |
| १९. | सीमावर्ती भागातील सुरक्षा | सीमावर्ती भागातील सुरक्षा आव्हाने आणि त्यांचे व्यवस्थापनः संघटित गुन्हेगारीचा दहशतवादाशी असलेला संबंध |
| २०. | भारतीय सुरक्षा दल | विविध सुरक्षा दले आणि संस्था आणि त्यांची कार्यकक्षा (mandate) |
नैतिकता, सचोटी आणि अभियोग्यता (Ethics, Integrity, and Aptitude) या पेपरमध्ये उमेदवारांची सार्वजनिक जीवनातील सचोटी, प्रामाणिकपणा यांशी संबंधित विषयांवरील वृत्ती आणि दृष्टीकोन, तसेच समाजाशी संवाद साधताना त्यांना येणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षांबाबतची त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य तपासण्यासाठी प्रश्नांचा समावेश
| अनुक्रमांक | विषय | विषयाअंतर्गत घटक |
|---|---|---|
| १ | नीतिशास्त्र आणि मानवी सुसंवाद | मानवी कृतींमधील नीतिशास्त्राचे सार, determinant आणि परिणाम; नीतिशास्त्राचे आयाम खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील नीतिशास्त्र. मानवी मूल्ये थोर नेते, सुधारक आणि प्रशासक यांच्या जीवनातून आणि शिकवणीतून मिळणारे धडे; मूल्ये रुजवण्यात कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका. |
| २ | वृत्ती | आशय, संरचना, कार्य; तिचा विचार आणि वर्तनावर होणारा प्रभाव आणि संबंध; नैतिक आणि राजकीय वृत्ती; सामाजिक प्रभाव आणि मन वळवणे (persuasion) |
| ३ | नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये | सचोटी, निपक्षपातीपणा आणि गैर-पक्षपातीपणा, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि कमकुवत घटकांप्रती करुणा |
| ४ | भावनिक बुद्धिमत्ता | संकल्पना, आणि प्रशासन व शासनातील त्यांची उपयुक्तता आणि उपयोजन. |
| ५ | विचारवंत आणि तत्वज्ञ | भारत आणि जगातील नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञांचे योगदान |
| ६. | लोक/नागरी सेवा मूल्ये आणि सार्वजनिक प्रशासनातील नीतिशास्त्र | स्थिती आणि समस्या सरकारी आणि खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि दुविधा; कायदे, नियम, नियमन आणि विवेकबुद्धी हे नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत; उत्तरदायित्व आणि नैतिक शासन; शासनातील नैतिक आणि मानवी मूल्यांचे बळकटीकरण; आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधी (funding) मधील नैतिक मुद्दे; कॉर्पोरेट गव्हर्नन्स. |
| ७. | शासनातील सचोटी | सार्वजनिक सेवेची संकल्पना; शासन आणि सचोटीचा दार्शनिक आधार; सरकारमधील माहितीची देवाणघेवाण आणि पारदर्शकता, माहितीचा अधिकार (RTI), नीतिशास्त्र संहिता (Codes of Ethics), आचारसंहिता (Codes of Conduct), नागरिक सनद (Citizen's Charters), कामाची संस्कृती, सेवा वितरणाची गुणवत्ता, सार्वजनिक निधीचा वापर, भ्रष्टाचाराची आव्हाने. |
| ८. | वरील विषयांवर आधारित केस स्टडीज |
दोनों प्रत्येकी २५० गुणचे आहेत. यामध्ये उमेदवाराने कोणताही एक विषय निवडायचा आहे
| अनुक्रमांक | विषय |
|---|---|
| १ | कृषी |
| २ | पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान |
| ३ | मानवशास्त्र |
| ४ | वनस्पतीशास्त्र |
| ५ | रसायनशास्त्र |
| ६ | स्थापत्य अभियांत्रिकी |
| ७ | वाणिज्य आणि लेखाशास्त्र |
| ८. | अर्थशास्त्र |
| ९. | विद्युत अभियांत्रिकी |
| १० | भूगोल |
| ११ | भूगर्भशास्त्र |
| १२ | इतिहास |
| १३ | कायदा |
| १४. | व्यवस्थापन |
| १५. | मराठी साहित्य |
| १६. | गणित |
| १७. | यांत्रिकी अभियांत्रिकी |
| १८. | वैद्यकीय विज्ञान |
| १९. | तत्वज्ञान |
| २०. | भौतिकशास्त्र |
| २१ | राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध |
| २२ | मानसशास्त्र |
| २३ | सार्वजनिक प्रशासन |
| २४ | समाजशास्त्र |
| २५ | सांख्यिकी |
| २६ | प्राणिशास्त्र |